जावरा संस्थान
जावरा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या माळवा एजन्सीमधील एक संस्थान. सध्या हा प्रवेश मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात समाविष्ट झाला आहे. क्षेत्रफळ १,४६५ चौ. किमी. लोकसंख्या १,१६,९५३ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. साडे आठ लाख रुपये. इंदूर, ग्वाल्हेर, रतलाम, प्रतापगढ, पिपलोदा या संस्थानांनी सीमित असलेल्या या संस्थानचा प्रदेश सलग नव्हता.